रयत प्रबोधिनीत

आपले स्वागत आहे

रयत प्रबोधिनी विषयी

  • स्थापना : 11 एप्रिल 2018
  • ध्येय : रयतेच्या हितासाठी सतत कार्यरत राहुन संवैधानिक नैतिकता असणारे प्रशासकीय अधिकारी घडवणे.
  • उद्दिष्ट : शासनकर्ती जमात व्हा. असा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला उपदेश प्रमाण मानत महाराष्ट्र राज्याच्या प्रशासकीय सेवेत बहुजन समाजातील जास्तीत जास्त अधिकारी घडावेत या उद्देशाने, रयत प्रबोधिनीची स्थापना दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी श्री. उमेश विठ्ठल कुदळे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली.
  • मिशन :

१) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन उपलब्ध करुन देणे.

२) अडचणीमध्ये असलेल्या विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे तसेच विद्यार्थ्यांचे समुपदेशन करणे.

३) सेवेसाठी ज्ञानार्जन हा विचार असणारे अधिकारी घडवणे.

४) तळागाळातील सामान्य माणसांपर्यंत लोकसेवा पोहोचवणारा विचार दृढ करणे.

  • उमेश कुदळे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले जयंतीदिनी दिनांक 11 एप्रिल 2018 रोजी रयत प्रबोधिनी स्थापना करण्यात आली.

रयतचे

प्रशिक्षक

उमेश पुष्पा विठ्ठल कुदळे (पोलिस उपनिरीक्षक)

B. Pharm, MBA, MA (History) संस्थापक-प्रवर्तक - रयत प्रबोधिनी, पुणे अध्यापन विषय : इतिहास अनुभव : पुण्यातील वेगवेगळ्या नामांकित संस्थांमध्ये 5 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव, unAcademy Educator प्रकाशित पुस्तके : महाराष्ट्रातील समाजसुधारक व व्यक्तीविशेष, इतिहास बूस्टर, भूगोल बूस्टर महाराष्ट्राच्या इतिहासाची परीक्षाभिमुख मांडणी करणाऱ्या एकमेव https://t.me/umeshkudale चॅनेलचे संपादन

विशाल मंगल रंगराव सुतार

MA, MEd कार्यकर्ता रयत प्रबोधिनी अध्यापन विषय : मराठी & CSAT Comprehension भाषा विभाग प्रमुख - रयत प्रबोधिनी अनुभव : 5 वर्षांचा अध्यापनाचा अनुभव, स्वरूपवर्धिनी तसेच पुण्यातील इतर नामांकित संस्थांमध्ये शिकवण्याचा अनुभव, unAcademy Educator Faculty - Pune University CEC department मराठी विषयाची परीक्षाभिमुख मांडणी करणाऱ्या एकमेव https://t.me/marathivishalsutar चॅनेलचे संपादन

विशाल राजाराम लोंढे

(व्यवस्थापकीय प्रमुख, रयत प्रबोधिनी) M.A. (Polity) अध्यापन विषय : महाराष्ट्र भूगोल आणि राज्यशास्त्र अनुभव : मागील 3 वर्षांपासुन रयत प्रबोधिनीमध्ये महाराष्ट्राचा भूगोल व भारतीय राज्यघटना या विषयांच्या अध्यापनाचा अनुभव प्रकाशित पुस्तके : महाराष्ट्र भूगोल (Booster) भारतीय राज्यघटना - भारत व महाराष्ट्र या विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/vishallondhe चॅनलचे संपादन

गजानन माधवराव भस्के

M.Sc. Micro Biology (Pune University) अध्यापन विषय : अर्थशास्त्र अनुभव : पुण्यातील वेगवेगळ्या संस्थांमध्ये 6 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव, महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अतिथी प्राध्यापक म्हणून कार्यरत, unAcademy Educator

प्रतिक पुरुषोत्तम भड

प्रतिक पुरुषोत्तम भड B.sc. Chemistry अध्यापन विषय : चालू घडामोडी अनुभव : 2 वर्षांपासून रयत प्रबोधिनी मध्ये चालू घडामोडी या विषयाचे अध्यापन, प्रकाशित पुस्तके : 1500+ चालू घडामोडी प्रश्नसंच चालू घडामोडी विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/pratikbhad9422 चॅनलचे संपादन

सुशील पांडुरंग दरवरे

सुशील पांडुरंग दरवरे (Ex. BANK PO) MBA (Finance), Sydenham, Mumbai अध्यापन विषय : CSAT (अंकगणित व बुद्धिमत्ता) अनुभव : बँकिंग, MPSC-UPSC CSAT, MBA या स्पर्धा परीक्षांसाठी शिकवण्याचा 10 वर्षांचा अनुभव. CSAT (अंकगणित व बुद्धिमत्ता) विषयाची परीक्षाभिमूख मांडणी करणाऱ्या https://t.me/promocsat चॅनलचे संपादन

प्रेमराज उज्वला पांडुरंग चव्हाण

B.Sc (Agriculture), M.A. (Pol.Sci) अध्यापन विषय : भूगोल आणि कृषी अनुभव : पुण्यातील नामांकित संस्थांमध्ये गेल्या 4 वर्षांहून अधिक काळ अध्यापनाचा अनुभव Unacademy toppers संवाद interviewer भूगोल व कृषी या विषयाची परिक्षाभिमुख मांडणी करणारया एकमेव https://t.me/PremrajChavan या चॅनेलचे संपादन

नवीन घडामोडी

Sorry! There are no post.

रयत प्रकाशनाची

पुस्तक

हिस्ट्री बुस्टर

लेखक: उमेश कुदळे

संपूर्ण मराठी

लेखक : विशाल सुतार

आमच्या विषयी

विद्यार्थी बोलताना

रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव -रयत प्रबोधिनीने MPSE अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन, नियोजन, updated teaching techniques, अवांतर वाचन आणि २४ तास उपलब्ध faculty members यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याच्या माझ्या स्वप्नाला strong foundation व योग्य दिशा मिळाली. out of box thinking, diversified approach develop होण्यात मदत झाली.
ऋतुजा मंगेश जांभळे
विद्यार्थिनी
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असतांना आपल्याला मार्गदर्शन व मार्गदर्शक या दोन बाबींची नितांत आवश्यकता असते. जेंव्हा या दोन्ही बाबी जुळून येतात तेंव्हा आपल्याला यशाच्या शिखरावर सहज पोहचणे शक्य होते,,, 2018 मध्ये माझी रयत प्रबोधिनीशी नाळ जुळली ते एक फॅमिली आहे हे रयतच्या कार्यावरून कळले, वर उल्लेखलेल्या दोन्ही गोष्टी तर विद्यार्थ्यांना इथे मिळतातच पण एक सुज्ञ ,सक्षम , व जिज्ञासू प्रशासकीय अधिकारी निर्माण होण्यासाठीच्या सर्व प्रकारच्या कलागुणांना इथे पैलू पाडले जातात,,,,, प्रवेश देतांना जी मुलाखत घेतली जाते त्यात सुरुवातीलाच विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या उणिवा शोधून त्याला त्यावर मात कशी करता येईल इथं पासून ते परीक्षेची वास्तविकता ही त्याला व त्याच्या पालकांना लक्षात आणून दिली जाते , व संपूर्ण अकॅडमीक कार्यकाळात विद्यार्थ्यांना एक स्पर्धक म्हणून घडवलं जाते,, रयत प्रबोधिनितील सर्व सेवकांमध्ये मला काम करण्याची मला संधी मिळाली ही माझ्यासाठी अभिमानास्पद बाब आहे जी कायम प्रशासनात सेवक म्हणून कार्य करण्यास मला तत्पर ठेवते ,,,,,
गोकुळ पाटील
पोलीस उपनिरीक्षक 2018​
नमस्कार विदयार्थी मित्रांनो स्वत: यशस्वी असणाऱ्या विदयार्थ्याच्या तळमळीतून चालणारी संस्था म्हणजे "रयत प्रबोधिनी" रयत प्रबोधिनीविषयी सांगण्यासारखे बोलावे तितके कमीच अस म्हणता येईल. थोडक्यात खूप काही आहे ज्या वेळी मी स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली त्यावेळी माझ्या समोर असंख्य अडचणी व प्रश्न होतेे, पण जस जस या वातावरणात मी वावरत असताना रयत मधील सर्व शिक्षकांशी संवाद साधला तसतश्या बारकाईने सगळ्या गोष्टी समजत गेल्या . इथे शाळेप्रमाणे सगळ्या गोष्टी करून घेतल्या जातात. स्वतः रयत मधील संपूर्ण शिक्षकवृंद एका कुटुंबाप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष अभ्यासासोबतच आयुष्यात काही अडचणी तर नाहीत ना हे देखील पाहतात. माझी सुरुवात योग्य मार्गदर्शनाने झाली त्यामुळे मला आता भिती किंवा आपला वेळ तर गेला नाही ना अशी कधी खंत वाटली नाही आणि वाटणार पण नाही. अभ्यासाविषयी काही अडचण आली तर आपण आपल्या शिक्षकांशी मनमोकळेपणाने बोलूू शकतो , मला रयत मध्ये अत्यंत मोलाची साथ मिळाली ती म्हणजे मला माझ्या भावा प्रमाणे असणारे मा. विशालजी लोंढे सर यांची तसेच इतर सर्व शिक्षक मंडळी ची सुद्धा मोलाची साथ लाभली आहे . रयत मध्ये मला जाणवलेला एक अनुभव म्हणजे रयत चे सर्वसर्वा प्रमुख ,संस्थापक, मार्गदर्शक मा.उमेशजी कुदळे सर हे इतिहास हा विषय शिकवतात,त्यांच्या लेक्टर ला बसलेलो असताना .खूप वेळ लेक्चर सूरू असताना इतकं सोपं आणि इतकं मग्न होऊन पोटतिडकीने, तळमळीने शिकवता की, सरांना तहान लागली असता पाणी प्यायला पाणीबॉटल घेतली असेल ,तर बोलता- बोलता ती बॉटल पाणी न पिता पुन्हा ज्या जागेवरून घेतली तिथे परत ठेवून देतात.आठवतचं नाही की आपल्याला पाणी प्यायच होत. आणि मला असं वाटत इतक्या प्रेमाने, आपुलकाने आपल्याला कोणी सांगेल की अभ्यास कसा करावा व कोठून करावा आणि सगळ्यात महत्त्वाच म्हणजे सुरुवात कशी असावी हे मला रयत प्रबोधनी मधून आपल्याला समजत आणि आपल्याला अधिकारी व्हवायचं म्हणजे पहिला विजय असतो की योग्य मार्गदर्शक आपण योग्य वळणार आपण आहोत का तरचं आपला पुढील मार्ग सुखकर होत असतो. इथे रोज तुम्ही काय - काय study केला , किती वेळ अभ्यास केलात याची दैनंदिन वही करायला लावतात . रयत मध्ये अभ्यास करून घेतलाच जातो. अशी ही रयत प्रबोधीनी अलीकडच्या कोविड 19 च्या काळात सुद्धा अनेक उपक्रमाच्या माध्यमातून समाजाप्रति जोडले गेले. सवैज्धानिक ,नैतिकता जपणारे अधिकारी घडविण्याचा प्रयत्न हे धन्यवाद!
अमोल रामदास फडतरे
आपला आज्ञार्थी विद्यार्थी
रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव -रयत प्रबोधिनीने MPSE अभ्यासासाठी योग्य मार्गदर्शन, नियोजन, updated teaching techniques, अवांतर वाचन आणि २४ तास उपलब्ध faculty members यामुळे प्रशासकीय अधिकारी होण्याच्या माझ्या स्वप्नाला strong foundation व योग्य दिशा मिळाली. out of box thinking, diversified approach develop होण्यात मदत झाली.
दिनेश सुनंदा सुहास राऊत
लेखपाल व लेखपरीक्षक नगरपरिषद
रयत प्रबोधिनी विषयीचा अनुभव - आम्ही बी-घडलो तुम्ही बी-घडा हे मला रयत मधूनच साध्य झालं. स्पर्धा परीक्षेतील गरीब आणि होतकरू मुलांसाठी योग्य मार्गदर्शन करणारी रयत प्रबोधनी आहे. रयत प्रबोधनी मधून स्पर्धा परीक्षा व्यतिरिक्त भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या ज्या मला माझ्या पुढील जीवनात उपयोगी पडतील .रयत प्रबोधनी मधील उमेश सर आणि त्यांची टीम यांचा मी सदैव ऋणी राहील. रयत प्रबोधनी मधील सर्व विद्यार्थ्यांना पुढील परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद
अविनाश रंगनाथ घोरपडे
पोलीस उपनिरीक्षक 2018
रयत प्रबोधिनी, पुणे ही संस्था स्पर्धा परीक्षेच्या विश्वात विद्यार्थ्यांना परीक्षाभिमुख योग्य पध्दतीने शिक्षणासोबतच घेतलेल्या विद्यार्थ्यांशिवाय जे विद्यार्थी क्लास लावू शकत नाहीत. हा सेल्फ स्टडी करुन पद काढण्याची इच्छा बाळगूण आहेत, त्यांनाही मार्गदर्शन करण्यासाठी, परीक्षेच्या कुठल्याही टप्प्यावर ही संख्या नेहमीच तत्पर राहिली आहे. याचा अनुभव मी स्वत: व माझ्या मित्र मैत्रीणींनी घेतला आहे. शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकतेच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपणारी ही संख्या कायम विद्यार्थ्यांच्या हितासाठी 'बोले तैसा चाले' या उक्तीप्रमाणे कार्यरत आहे. रयत प्रबोधिनीच्या सर्व टिमला व संस्थेला या कार्यात पुढील वाटचालीसाठी खुप शुभेच्छा!
कु. भारती विमल दिगंबर मामनकार
PSI (पो. स्टे. फ्रेजरपुरा,अमरावती)

ब्लॉग

Sorry! There are no post.