आमच्या विषयी

संविधानिक नैतिकता असणारे अधिकारी घडण्याचे उद्दिष्ट डोळयांसमोर ठेऊन दि.११ एप्रिल २०१८ रोजी महात्मा फुले यांच्या जयंतीचे औचित्य साधून रयत प्रबोधिनी या संस्थेची स्थापना झाली. आणि अवघ्या तीन वर्षात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये कष्ट करणारी आणि अभ्यास करवून घेणारी तसेच सर्वाधिक निकालाची परंपरा असलेली संस्था म्हणून या संस्थेने नावलौकिक मिळवले.

रयत प्रबोधिनी मध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर विद्यार्थ्यांना त्यासाठी मुलाखत प्रक्रियेला सामोरं जावं लागते रयत ची एकंदरीत भूमिका काय?

तर अगदी निवडक विद्यार्थ्यांसह काम केले पाहिजे, अशी भूमिका घेत ही प्रवेश प्रक्रिया राबवते मुलाखतीत विद्यार्थ्यांच मूल्यमापन, जिद्द, कष्ट करण्याची तयारी सगळे कसून तपासले जात आणि नंतर त्यातील निवडक विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जातो.

‘कष्ट करणे हीच आमची श्रद्धा’ याच मूलतत्वावर आम्ही विद्यार्थ्यांकडून मेहनत करून घेतो.

कर्मवीर अण्णांचा विचार रयत प्रबोधिनी च्या माध्यमातून पुढे घेऊन जाण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न आहे. म्हणून ‘सेवार्थ ज्ञानार्जन’ अर्थात ज्ञानार्जन हे सेवेसाठी असले पाहिजे हे ब्रीद घेऊन आम्ही ही रयत परंपरा पुढे घेऊन जात आहोत.

अनेक बाबतीत काम करत असताना ते केवळ अभ्यासावर अवलंबून न राहता result ओरिएंटेड स्ट्रेटर्जी  वर  देखील येथे काम करून घेतले जाते.

 

या सर्व प्रक्रियेमध्ये रयतच्या विद्यार्थ्यांना सोबतच विद्यार्थ्यांचे पालकही सहभागी असतात.

स्पर्धापरीक्षा म्हणजे अभ्यास एके अभ्यास नव्हे तर त्या विद्यार्थ्यांनी वास्तविक जगाबद्दल याची देही याची डोळा जागरूक असणं गरजेचं आहे.

याच अनुषंगाने रयत प्रबोधिनी ‘वारी विथ विस्डम’ या उपक्रमाचे दरवर्षी आयोजन करते. पंढरपूर वारीच्या जेजुरी ते वाल्हे ह्या टप्प्यात रयत चे विद्यार्थी वारकऱ्यांसोबत चालतात, प्रश्न समजून घेतात आणि वारीचं प्रशासन देखील समजून घेतात.

रयत मध्ये विविध महापुरुषांच्या जयंतीचे आयोजन केले जाते आणि ह्या कार्यक्रमप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करत असतात. ह्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे मा.अध्यक्ष मा.सदानंद मोरे सर, पुणे शहर पोलीस मा. उपयुक्त भानुप्रताप बर्गे सर, काश्मीर मधील विद्यार्थयांसाठी अहोरात्र झटणारे आणि त्यांचा आधार बनणारे सारंग गोसावी यांसारख्या अनेक मान्यवरांनी गेल्या काही वर्षात रयत ला भेट दिली आणि विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन देखील केले आहे.

अभ्यासक्रम पूर्ण करून घेत असताना आयुष्याचा अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी लागणारी शिदोरी देण्याचा प्रयत्न आम्ही करतो.

अश्याप्रकारे विद्यार्थ्यांना सर्व पातळीवरून तयार करून घेतले जाते.रयत आजपर्यंत तितक्याच कसोशिने मेहनत घेत आहे इथून पुढेही घेत राहील आणि कर्मवीर अण्णांच्या विचारांची ज्योत अशीच अखंड तेवत राहील.