रयत सामाजिक योगदान

रक्तदान शिबिरे

रक्ताची असलेली तूट भरुन निघावी यासाठी हातभार लावण्याचा निर्धार करत महात्मा फुले जयंतिदिनी व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीदिनी रयत प्रबोधिनीमध्ये दरवर्षी रक्तदान शिबीरे आयोजित केली जातात. तसेच या संस्थेचे विद्यार्थी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी रक्तदान शिबीरे आयोजित करतात. आत्तापर्यंत या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातुन ४०० पेक्षा अधिक रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले आहे.

(गरजवंत वारकरी बांधवांना मोफत रक्त पुरवठा व्हावा आणि रक्ताची असलेली तूट भरुन निघावी यासाठी हातभार लावण्याचा निर्धार करत ‘आम्ही वारकरी’ ने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात आळंदी मधे टीम रयतने सहभाग घेतला. ज्ञानोबा -तुकोबा हा महाराष्ट्राचा मूलमंत्र आहे. या मुलमंत्राच्या विचारावर कार्यरत असणारी रयत आणि रयतच्या सर्वच टीमने उत्साहाने शिबीरात सहभाग घेतला.)

वारी विथ विस्डम (Wari With Wisdom)

‘वारी म्हणजे काय?‘ हे विस्तृत पणे समजून घेत असताना वारीतील व्यवस्थापन, प्रशासन, शिस्त, यांची वास्तविक ओळख या उपक्रमातून होते. महाराष्ट्र सारख्या पुरोगामी राज्यासाठी भविष्यात उत्तम अधिकारी घडताना हे निरीक्षण आणि अनुभव अत्यंत गरजचे आहे.

वारी विथ विस्डम या उपक्रमात सहभागी विद्यार्थी व संपूर्ण रयत टीम

वारी विथ विस्डम या उपक्रमात सहभागी विद्यार्थी व संपूर्ण रयत टीम

मा. राजाभाऊ चोपदार (संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार) विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना

महाराष्ट्र धर्म म्हणजे काय, लोकशाही, समता, सहिष्णुता या गोष्टी समजावून घेता याव्यात. महाराष्ट्राच्या हरऐक सामाजिक प्रश्नाचे उत्तर ‘वारी ‘समजावून घेतल्यावर नक्कीच मिळू शकेल. वारकरी म्हणजे फक्त टाळकुटे नव्हेत. भक्तीचा, श्रध्देचा अवीट अनुभव देत असतानाच ज्ञान, उर्जा, सामाजिक जाणिवेचा एक प्रचंड मदहासागर म्हणजे वारी, हे Wari With Wisdom मुळे आत्तापर्यंत रयत प्रबोधिनीच्या ५०० हुन अधिक  विद्यार्थ्यांना सहभाग घेऊन खऱ्या अर्थाने आयुष्य समृद्ध झाल्याचा अमृतानुभव Wari With Wisdom च्या माध्यामातून आम्ही वारकरी संस्थेने दिला.

व्याख्याने, चर्चासत्रे व इतर कार्यक्रम

रयतमध्ये विद्यार्थ्यांनबरोबर संवाद साधण्यासाठी रयतचे विद्यार्थी अधिकारी तसेच प्रशासनात दीर्घकालीन अनुभव घेतलेले प्रशासकीय अधिकारी आणि सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत व्यक्तेंची वेळोवेळी मार्गदर्शन होत असते.

त्यातुन विद्यार्थी ज्या क्षेत्रात जाणार आहे त्या क्षेत्राची जाणीव, समज व आकलन होण्यास मदत होते. व विद्यार्थी उत्तरोत्तर परिपक्व होत जातात.

• रयत नुतनीकरण सोहळा

गुरुवर्य मा.प्रा.डॉ. सदानंद मोरे सर (संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक) यांच्या हस्ते रयत नुतनीकरण सोहळा संपन्न झाला.

• राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळा

 • मा.श्री.सुशिलकुमार शिंदे सर (साहित्य अकादमी युवा पुरस्कार – २०१९) यांच्या उपस्थितीत राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळा पार पडला.

• राजर्षी शाहू महाराज जयंती सोहळा

 • मा. प्रा.डॉ.गोरख सांगळे व मा.अ‍ॅड. गणेश शिरसाठ (प्रसिध्द विधिज्ञ) यांच्या उपस्थितीत कर्मवीर भाऊराव पाटील जयंती सोहळा व रयत विद्यार्थी संघ उद्घाटन समारंभ पार पडला

माहिती अधिकार कार्यशाळा

 • मा.प्रा.शिवकुमार चन्नागिरे सर (यशदाचे मार्गदर्शक) यांनी रयत प्रबोधिनीने आयोजित केलेल्या माहिती अधिकार कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

'विचारांच्या पलीकडचा काश्मीर

 • : रयत विद्यार्थी संघ आयोजित “ग्रेट भेट विथ ग्रेट पीपल” चर्चासत्र मालिकेतील – ‘विचारांच्या पलीकडचा काश्मीर’ या विषयावर एक मराठमोळा इंजिनियर ज्याने आयुष्याची २० वर्षे जम्मू काश्मीरच्या लोकांसाठी वेचली आहेत अशा मा.सारंग गोसावी (संस्थापक, असीम फाउंडेशन) सरांचे चर्चा सत्र पार पडले.यावेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देत काश्मिरी लोकांच्या जीवनाचा त्यांनी उलगडा केला. (5 फेब्रुवारी 2020)

शिवजयंती कार्यक्रम

‘एखाद्या राष्ट्राला व राज्याला जाज्वल्य इतिहासाची परंपरा लाभलेली असेल तर त्या राष्ट्राचा वर्तमान व भविष्यकाळ हा नक्कीच दैदीप्यमान असतो’ हे छत्रपतींच्या जन्मदिनी पटवून देताना मा. रवींद्र मालुसरेजींनी (मुंबई मराठी पत्रकार) नरवीर तानाजी -सूर्याजी मालूसरेंचा सुवर्णमय इतिहास मांडला. नरवीर तानाजी हे तरुणांसमोर उभा असणारा धगधगता प्रेरणास्रोत आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी तानाजींवर पोवाडा रचला, मात्र त्यातील असणारी ऊर्जा आपल्या साम्राज्याला घातक ठरेल म्हणून त्यावर बंदी घालण्याचे काम ब्रिटिशांनी केले. असे अनेक नरवीरांच्या लढायांचे प्रसंग रयत प्रबोधिनीच्या विद्यार्थ्यांना मा. रवींद्रजी मालुसरेंनी सांगितले जे सकारात्मक ऊर्जा भरणारे होते. (21 फेब्रुवारी 2020)

पाणी फाऊंडेशन

 • पाणी फाऊंडेशनच्या मिडीया विभागाच्या नॅशनल हेड मा. नम्रता भिंगार्डे यांनी ‘रयत प्रबोधिनीला’ भेट दिली. अमीरखान यांच्या नेतृत्वाखाली पाणी फाऊंडेशनमधून जनमानसात काम करताना आलेला आपला अनुभव त्यांनी रयतच्या विद्यार्थांशी शेअर केला. (28 डिसेंबर २०२०)

परिवर्तन युवा वक्ता - २०२०

 • ‘वक्ता दशसहस्त्रेषु’ या सुभाषिताप्रमाणे विद्याथ्र्यांमध्ये संभाषण कौशल्य विकसित होण्यासाठी ‘परिवर्तन संस्था, पुणे’ या संस्थेने पुण्यामध्ये १७ जानेवारी २०२१ रोजी राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. संस्थेचे हे चौथे वर्ष असून त्यामध्ये महाराष्ट्रातील ६० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता या कार्यक्रमाचे पायोजकत्व रयतने घेतले होते. उत्तम संयोजन, दर्जेदार स्पर्धक आणि सजग श्रोते हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणावेल लागेल.

अधिकारी मार्गदर्शन

 • राजर्षी शाहू महाराज जयंतीला MPSC च्या नवीन बॅच च्या orientation ला सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी मा.विजयसिंह भोसले,  संत ज्ञानेश्वर महाराजांचे वंशपरंपरागत चोपदार राम रंधवे चोपदार, रयत प्रबोधिनीचे उमेश विठ्ठल कुदळे, आदी मान्यवर उपस्थित होते.  यावेळी भोसले  सर, कुदळे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक अडीअडचणींमधे सोबत राहण्याची ग्वाही दिली. (२६ जून २०१८)
 • कोल्हापुरचे सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. प्रसाद गाजरे सर यांनी रयत प्रबोधिनीला भेट दिली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या नैसर्गिक पूरआपत्तीमध्ये प्रशासकीय व्यवस्थापनात प्रसादसरांनी मोलाचे योगदान दिले.  महापूराच्या काळात NDRF, Naval Team यांच्या हालचाली करीता आवश्यक वाहनांचा पुरवठा RTO, ST व KMT कोल्हापूर कडून करण्यात आला. त्या साऱ्या मोहीमेत प्रसादजी अग्रेसर होते. बाधित गांवाना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशिल असणाऱ्यांचा समन्वय घडवण्याचा प्रयत्न त्यांनी या काळात केला. (12 डिसेंबर 2019)
 • रयत प्रबोधिनी पुणे मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) श्री. भारत गोसावी सरांचे मार्गदर्शनपर चर्चासत्र झाले. यावेळी त्यांनी अभ्यास करत असताना येणारा ताणतणाव तसेच अभ्यासाचे नियोजन आणि पोलीस प्रशासनात काम करत असताना येणारा कामाचा अनुभव याबाबत आपले विचार मांडले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची देखील त्यांनी मुक्तपणे उत्तरं दिली. (31 जानेवारी 2020)
 • पोलिस खात्यात ३४ वर्ष अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणणारा व्यक्ती गंभीरपणे बोलेल असा काहीसा पूर्वग्रह घेऊन ऐकायला बसलेले सगळेच विद्यार्थी पहिल्या टप्प्यातच बर्गे साहेबांच्या खुमासदार शैलीने सुखावले. स्वतःचं Presentation कसं असावं या अगदी साध्या पण महत्वाच्या मुद्द्यापासून झालेली सुरुवात,ग्रामीण पार्श्वभूमीचा न्यूनगंड,इंग्लिशची भीती, आत्मविश्वासाचा अभाव आणि समोर आलेल्या परिस्थितीला बाहेर पडण्याचा मार्ग हाताशी राखून अंगावर घेण्याची वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे सहज भाषेत  सरांनी सांगितले.शेवटच्या माणसाशी नाळ जोडून,जनतेशी संवाद वाढवून आपलं काम आपण चोखपणे बजावत गेलो तर कठीण प्रसंगी सामान्य माणसांसोबत आपले वरीष्ठ आणि राजकीय पक्षही आपल्या पाठीशी कसे उभे राहतात याचा अनुभव सरांकडून मिळाला. (13 फेब्रुवारी 2020)
 • रयत प्रबोधिनी परिवाराचे हितचिंतक कर्तव्यदक्ष पोलीस उपनिरीक्षक “मा. विशाल शिंदे” यांनी रयत प्रबोधिनीला सदिच्छा भेट दिली. (1 डिसेंबर 2020) 
 • रचना गवळी मॅडम(सहाय्यक कक्ष अधिकारी, वने व महसूल मंत्रालय) यांनी रयत प्रबोधिनीतील विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला.त्यांनी त्यांचा कॉलेज पासून ते प्रशासकीय अधिकारी होण्यापर्यंतचा प्रवास व प्रशासनातील अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. (14 feb 2021)
 • पोलिस खात्यात ३४ वर्ष अट्टल गुन्हेगारांना वठणीवर आणणारा व्यक्ती गंभीरपणे बोलेल असा काहीसा पूर्वग्रह घेऊन ऐकायला बसलेले सगळेच विद्यार्थी पहिल्या टप्प्यातच बर्गे साहेबांच्या खुमासदार शैलीने सुखावले. स्वतःचं Presentation कसं असावं या अगदी साध्या पण महत्वाच्या मुद्द्यापासून झालेली सुरुवात,ग्रामीण पार्श्वभूमीचा न्यूनगंड,इंग्लिशची भीती, आत्मविश्वासाचा अभाव आणि समोर आलेल्या परिस्थितीला बाहेर पडण्याचा मार्ग हाताशी राखून अंगावर घेण्याची वृत्ती असे वेगवेगळे मुद्दे सहज भाषेत  सरांनी सांगितले.शेवटच्या माणसाशी नाळ जोडून,जनतेशी संवाद वाढवून आपलं काम आपण चोखपणे बजावत गेलो तर कठीण प्रसंगी सामान्य माणसांसोबत आपले वरीष्ठ आणि राजकीय पक्षही आपल्या पाठीशी कसे उभे राहतात याचा अनुभव सरांकडून मिळाला. (13 फेब्रुवारी 2020)

समाजउपयोगी उपक्रम

कोविड काळातील उपक्रम

 • गरीब व होतकरु कुटूंबांशी असलेली सामाजिक नाळ अधिक घट्ट करण्यासाठी रयत प्रबोधिनीने मदत केली.

  सर्वसामान्य माणासांसोबत आपण सदैव असलं पाहिजे हा विचारांचा वारसा घेऊन रयत उभी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रयत प्रबोधिनीने केलेल्या आवाहानाला प्रतिसाद देत समाजाप्रती कृतज्ञता म्हणून या काळात मदत करण्याची जबाबदारी काही जणांनी उचलली. ५० रुपयांपासून ११००० रुपयांपर्यंत रक्कम विद्यार्थी ,शिक्षक ,हितचितंक यांनी जमा केली. या माध्यामातून “४४१३६” रुपये एवढी रक्कम उभी राहिली. उभ्या राहिलेल्या रकमेतून पहिल्या टप्प्यात रयत प्रबोधिनीने पाच कुटूंबांना मदत केली.

रयत प्रबोधिनी आपली समाजातील कष्टकरी व गरीब होतकरू कुटुंबांशी असलेली सामाजिक नाळ या कोरोना सदृष्यकाळात देखील जपून होती. पुणे महानगरपालिका कार्यक्षेत्रात हातकाम करणाऱ्या ५ कुटूंबांना प्रबोधिनीने मदत केली. दुसऱ्या टप्यातील मदत म्हणून गडहिंग्लज परिसरातील दुर्गम भागातील अदिवासी आणि कष्टकरी बांधवासाठी कार्य करणाऱ्या अमित प्रभा वसंत यांना मदत सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या माध्यामातून आपल्या बांधवांपर्यंत ही मदत पोहोचवली गेली आहे.

ही मदत पोहचवताना आलेला अनुभव खुद्द अमित प्रभा वसंत सर यांनी या ठिकाणी त्यांचा शब्दांत मांडला आहे. – “प्रत्यक्ष हस्तांतर सुरू केल्यावर कित्येक झोपड्यांना दारं नसल्याचं लक्षात आलं…! त्यामुळं दारात जीवनावश्यक सामान ठेऊन दार ठोठावून माघारी परतणं शक्य होणार नव्हतं. सामान स्वीकारताना कुणाचा संकोच होऊ नये, आत्माभिमानाला ठेच लागू नये म्हणून असा विचार करत होतो. पण यावर अपारदर्शक पिशव्या घेऊन एकट्याच व्यक्तीनं संबंधित घरात जायचं, अशी संकल्पना केली ! सबंध दोन महिन्यांत एक गोष्ट केली – ज्या ठिकाणी अत्यंत गरजू आणि निराधार लोक आहेत – वृद्ध, अपंग, ज्या घरात मागच्या काळात मोठी आजारपणं आणि दवाखाने झाले आहेत अशी कुटुंबं, स्थलांतरित कामगार अशा ठिकाणची माहिती जमा केली. ज्या घरात हे जीवनाधाराचं सामान हस्तांतरित करायचं आहे त्यांची यादी बनवली. आणि प्लास्टिकच्या पिशव्यांऐवजी घरातल्या सामानाच्या पिशव्यांमध्ये तेल, चटणी, मीठ, बेसन, साखर, चहापावडर, हळद, कांदे, बटाटे, दंतमंजन, आंघोळ आणि कपड्यांचा साबण, बिस्किटे भरली . गावातल्या ठिकाणी चालत जाऊन हे सामान पोहोच केलं. यामुळं सामान घेणाऱ्या लोकांना संकोच वाटला नाही.

सौ.वेशालीताई भांडवलकर यांच्या निर्माण या संस्थेमार्फत भटक्याविमुक्त, वंचित, प्रामुख्याने भंगार गोळा करणाऱ्या कुटूंबापर्यंत पोहचवली आहे. या टप्प्यात २१ कुटूंबाना किमान ४० दिवस पुरेल इतका किराणा वितरीत करण्यात आला होता.

मोफत वर्ग व टेस्ट सिरीज

MPSC च्या संयुक्त आणि राज्यसेवेच्या पूर्व परिक्षा तोंडावर असताना कोरोनामुळे लॉकडाऊन झाले. तरीही रयत प्रबोधिनी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या या साऱ्या विद्यार्थ्यांसोबत आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासामध्ये कुठल्याही प्रकारचा खंड पडू नये आणि कोरोनामुळे ज्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज आणि इतर वर्गांची प्रवेश फी भरणे अवघड जात आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांचे मोफत वर्ग आणि टेस्ट सिरीज उपलब्ध करून दिल्या. 

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना मोफत शैक्षणिक साहित्य आणि मार्गदर्शन मिळावे या हेतूने नवीन अ‍ॅप कार्यान्वित केले.

Mpsc च्या संयुक्त आणि राज्यसेवेच्या पूर्व परिक्षा तोंडावर असतांना कोरोनामुळे लॉकडाऊन झाले.

तरीही ऑनलाईन लेक्चर्स व्यवस्थित सुरू होते.  

दररोज नोट्स PDF स्वरूपात प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यत पोहचवल्या जात होत्या.

ऑनलाईन पध्दतीने प्रत्येक विद्यार्थ्याचा अभ्यास आढावाही पूर्ण होत होते.

रयत प्रबोधिनीने विद्यार्थ्यांच्या नियमित टेस्ट सरावात खंड पडू नये म्हणून तातडीने App तयार करून त्यावर टेस्ट सिरीज मोफत उपलब्ध करून दिल्या, जेणेकरुन Mpsc ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचा फायदा झाला.

पुस्तक संकलन मोहीम

वाचन प्रेरणा दिनानिमित महाराष्ट्रातील दुर्गम व ग्रामीण भागात ज्ञान संस्कृती रुजवण्यासाठी हातभार लावूया! पुणेकरांनी या उपक्रमासाठी मागील तीन वर्षांपासून भरभरून प्रतिसाद दिला आहे. याहीवर्षी गर्दी न करता कोरोनाचे सर्व निकष पाळून ही मोहीम चालवली होती.  

विद्यार्थी विकास उपक्रम

विद्यार्थ्यांला मिळणाऱ्या विषय ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी रयतमध्ये अनेक विद्यार्थी केंद्री उपक्रम होत असतात.

विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व विकास होण्यासाठी विविध व्याख्याने, चर्चासत्र, जयंत्या, रक्तदान शिबीर यासारखी उपक्रम घेतले जातात.

या सर्व उपक्रमांचे आयोजन विद्यार्थीच करत असतात म्हणजेच सुत्रसंचालन, स्वागत, मनोगत, आभार, सर्व साहित्यांची/सामग्रीची जुळणी इ. म्हणजेच हा उपक्रम विद्यार्थीच विद्यार्थ्यांसाठी चालवित असतात.