रयत विद्यार्थी संघ

कोणीतरी म्हटले आहे की, “एखाद्याने बदल आणण्यास सुरुवात केली पाहिजे. मग हळूहळू आजूबाजूचा परिसर देखील बदलेल.”
पुण्यात दरवर्षी हजारो मुले-मुली स्पर्धा परीक्षेची तयारी करायला येतात. त्यातील बरेच अगदी हलाखीच्या परिस्थितीतून आपले स्वप्न घेऊन आलेले असतात. अशा होतकरू मुलांना वेळ आणि आर्थिक कारणामुळे नेहमी झगडत रहावे लागते. अशा होतकरू मित्रांसाठी आम्ही उभं राहायचं ठरवलंय.

मदतीचे स्वरूप काय असेल?

मुख्यतः मदतीचे स्वरूप साधारणत: जेवणाचा खर्च सांभाळणे, अभ्यासिकेचा खर्च, राहण्याचा खर्च, पुस्तकांचा खर्च किंवा अतिमहत्त्वाच्या अशा वैद्यकीय उपचारांचा खर्च इत्यादी असेल.

सभासद कोण होऊ शकत?

सभासद संख्या अगदी मर्यादित असणार आहे. त्यामुळे सध्यापुरती रयत प्रबोधिनीच्या आजी-माजी विद्यार्थी मित्रांसाठीच खुली असणार आहे. त्यासाठी एक अर्जाचा नमुना भरून घेतला जाईल व त्यानुसार सभासद निवड होईल.