रयत अभ्यास मॉडेल

अध्यापन पध्दत

रयत प्रबोधिनीचा दृष्टिकोन नेहमीच विद्यर्थीकेंद्री असून विद्यर्थ्यांसाठी समुह अध्यापन तर होतेच शिवाय त्यांना वैयक्तीक मार्गदर्शन ही होत असते.

वर्गामध्ये दररोज ४ तास अध्यापन होत असते. त्यामध्ये २ स्वतंत्र्य विषय शिकविले जातात. त्यासाठी रयतचे अध्यापक हे स्वत: अभ्यास करुन, संशोधन करुन अद्यावत नोट्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. शिवाय एकदा एक विषय सुरु झाल्यावर तो पुर्ण केला जातो.

सुरुवातीला मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुर्ण करुन नंतर पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पुर्ण केला जातो शिवाय पुन्हा मुख्य परीक्षेचा दृष्टिकोन तयार होण्यासाठी मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम पुर्ण केला जातो. म्हणजेच आपण एक विषय साधारणत: दोन वेळा शिकवत असतो.

तयारी बरोबरच विविध अभ्यास व अभ्यासेत्तर उपक्रमाद्वारे मुलाखतीची तयारी करुन घेतली जाते.

टेस्ट/चाचणी

विषयाची पुर्णपणे समज/आकलन झाले आहे की नाही हे फक्त शिकवून/अध्यापन करुन समजत नाही तर त्यासाठी आपल्याकडे

१) घटकनिहाय

२) विषय निहाय

३) Comprehensive– (संपुर्ण/मिश्र)

अशा टेस्ट घेतल्या जातात.

वरील टेस्ट ह्या जो विषय वर्गामध्ये शिकविण्यासाठी घेतला आहे त्यावरच घेतल्या जातात. शिवाय पूर्व अध्यापन झालेल्या घटक/विषयावरील टेस्ट मध्ये-मध्ये घेतल्या जातात. तसेच त्या टेस्ट चे विश्लेषण विद्यर्थ्याकडुन कडून लिहून घेतले जाते.

दैनंदिन नोंदवही

आपला नेमका अभ्यास कसा चालला आहे? अभ्यासाची आपली दिशा नेमकी कशी आहे? आपले Strong किंवा Week Point नेमके कोणते आहेत? या सर्वांचे स्वमुल्यमापन करण्यासाठी नोंदवही विद्यार्थ्यांना आपण देत असतो.

त्यासाठी विद्यार्थ्यांना एक वही दिली जाते व त्यानुसार त्यांना दररोज खालील प्रश्नांची उत्तरे लिहावी लागतात.

१) क्लासमध्ये काय शिकविले?

२) मी अभ्यासिकेत काय वाचले?

३) अवांतर वाचन काय केले?

४) किती वेळ अभ्यास केला?

५) आयोगाचे किती प्रश्न सोडविले?

६) स्वमुल्यमापन म्हणुन आजच्या दिवसासाठी मला १० पैकी किती गुण मिळाले?

या सर्व प्रश्नांची उत्तरे विद्यार्थी व्यवस्थितपणे देत आहे की नाही किंवा तो त्यासंदर्भात किती गंभीर आहे. हे समजण्यासाठी त्या विद्यार्थ्यांचा आपण ‘अभ्यास आढावा’ घेत असतो.

विद्यार्थी अभ्यास आढावा

प्रत्येक महिन्याच्या शेवटी विद्यार्थ्यांनी लिहलेल्या नोंदवही जमा करुन घेतल्या जातात. त्याप्रमाणे प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या लिहलेल्या दैनंदिनीमधून अभ्यासाचे प्रश्न विचारले जातात. थोडक्यात आपण त्याची ‘तोंडी परीक्षा’ घेत असतो.

त्यानुसार आपण त्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थ्यांचे Strong व Week Point वर चर्चा करुन त्याप्रमाणे विद्याथ्र्याला समुपदेश केले जाते. व पुढील अभ्यासाची दिशा निश्चित केली जाते.

सहामाही सत्र अहवाल

रयत प्रबोधिनी ही विद्यार्थी  केंद्री असल्यामुळे त्या विद्यार्थ्यांचा परीक्षेच्या दृष्टीने विकास करण्यासाठी रयत व त्या विद्यार्थ्याचे पालक सदर विद्यार्थ्याला मदत करत असतो.

रयतमध्ये नेमके काय घडते? म्हणजेच

१) विषय अध्यापन

२) चाचण्या

३) अभ्यासेत्तर उपक्रम

या तीन घटकांची माहिती पालकांना पहिल्या सहामाही मध्ये पोस्टाद्वारे पाठविले जाते. ही जास्त आम्ही आमची जबाबदारी मानतो.